Hall Tickets (H.S.C. Examination Feb/March-2023)
१२ वी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना
सर्व विद्यार्थ्यांनी एच एस सी परीक्षा फेब्रुवारी/ मार्च २०२३ परीक्षेचे प्रवेशपत्र मिळाल्यानंतर प्रवेशपत्रावरील खालील बाबी काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात व काही चूक असल्यास त्वरित आपल्या वर्ग शिक्षकांची संपर्क साधावा.
1) विद्यार्थ्यांचे नाव - नावाचे स्पेलिंग बरोबर आहे का ते तपासून घ्यावे.
2) आईचे नाव - आईचे नाव बरोबर आहे का ते तपासून घ्यावे.
3) बारावीला घेतलेले विषय - विद्यार्थ्यांनी बारावीला घेतलेले सर्व विषय बरोबर आहेत का त्याची खात्री करावी.
4) उत्तर लेखनाची भाषा (Language of Answer) - प्रत्येक विषयाच्या उत्तर लेखनाची भाषा (माध्यम, Medium) बरोबर आहे का त्याची खात्री करावी.
5) फोटो - विद्यार्थ्याचा फोटो व्यवस्थित आला आहे का याची खात्री करावी. जर फोटो व्यवस्थित नसेल किंवा ओळखू येत नसेल तर त्यावर शाळेच्या युनिफॉर्म मधील विद्यार्थ्याने स्वतःचा फोटो चिकटवून प्राचार्यांची सही व शिक्का घ्यावा.
6) विद्यार्थ्यांची सही- फोटो खाली विद्यार्थ्यांची सही व्यवस्थित आली आहे की नाही त्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांची सही व्यवस्थित आली नसेल किंवा ओळखून येत नसेल तर फोटोखाली विद्यार्थ्यांनी काळ्या शाईच्या पेनाने फॉर्म भरताना ज्या प्रकारे सही केली आहे तशीच सही करावी.
7) प्राचार्यांची सही व शिक्का- विद्यार्थ्याच्या सही खाली प्राचार्यांचा सही व शिक्का आहे की नाही याची खात्री करावी. सही व शिक्का नसेल तर त्वरित आपल्या वर्ग शिक्षकांशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा