Verification of Marks, Photocopy of Answer book, Revaluation of Answer book व Migration Certificate साठी सूचना.
1) विद्यार्थ्याला फक्त स्वत: च्याच अनिवार्य सहा विषयांच्या (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीची मागणी करता येईल.त्यासाठी विद्यार्थ्याने स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (website) संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक राहील.विद्यार्थ्यास तोंडी /प्रात्यक्षिक /श्रेणी/ अंतर्गत मूल्यमापन/प्रकल्प लेखन किवा तत्सम उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींची मागणी करता येणार नाही.ज्या विषयांची उत्तरपत्रिका छायाप्रत आवश्यक आहे ते सर्व विषय एकाचवेळी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा अर्ज करता येणार नाही.
2) परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून २० दिवसांपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून विहित नमुन्यात अर्ज करता येईल.अर्ज करण्याचा अंतिम दिनांक प्रत्येक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी जाहीर करण्यात येईल.
3) छायाप्रत मिळण्यासाठी केलेल्या अर्जातील माहिती पूर्णपणे भरलेली असावी तसेच विहित शुल्क न भरल्यास उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही.
4) उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी प्रती विषयास रु.४००/-इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit card/Credit card /UPI/Net Banking) भरता येईल.व भरणा केलेले शुल्क नापरतावा असेल.तथापि, उत्तरपत्रिकेची छायाप्रत देण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या गुणपडताळणीत विद्यार्थांच्या गुणात/ निकालात बदल झाल्यास उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी भरलेले शुल्क परत दिले जाणार नाही.
5) उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती देण्यापूर्वी त्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी केली जाते.गुणपडताळणी केल्यानंतर त्यावर होणारा निर्णय अंतिम असेल व तो विद्यार्थ्यांवर बंधनकारक राहील.अशा प्रकरणी विद्यार्थ्यास मूळ गुणपत्रिका संबधित विभागीय मंडळाकडे जमा केल्यानंतरच त्यास सुधारित गुणपत्रिका देण्यात येईल.
6) उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी अर्ज केला असल्यास त्याच विषयाच्या गुणपडताळणीसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही व असा स्वतंत्र अर्ज गुणपडताळणी शुल्कासह केल्यास त्यावर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही.
7) मागणी केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती विद्यार्थ्याना त्यांनी अर्जात नमूद केल्याप्रमाणे देण्यात येतील.उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती घेतल्यानंतर विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावयाचा असल्यास त्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती प्राप्त करून घेण्याची सूचना सबंधित विभागीय मंडळाकडून मिळाल्याच्या तारखेपासून कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती घेऊन जाणे बंधनकारक असेल.याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे. i) रजिस्टर पोस्टाने मागणी केलेल्या प्रकरणात पोस्टासाठी सात दिवसाचा कालावधी सोडून कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. ii) उत्तरपत्रिका छायाप्रत हस्तपोहोच मिळाल्या पासून पाच दिवसात अर्ज करता येईल. iii) ईमेलद्वारे/संकेतस्थळावरून पाठवलेल्या प्रकरणी सॉफ्ट कॉपी विभागीय मंडळाकडून पाठविल्याच्या दिनांकापासून पाच दिवसात अर्ज करता येईल.
8) उत्तरपत्रिकांची छायाप्रत समक्ष नेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall ticket) / फोटोसह असलेले कोणतेही ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य राहील तसेच उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळाल्याची पोहोच देणे बंधनकारक राहील.
9) परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केलेल्या विद्यार्थ्यांना त्याच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत देण्यात येणार नाही.
10) संबधित विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेची छायाप्रत अन्य कोणालाही दिल्यास अथवा प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रसिद्धी दिल्यास विद्यार्थी कारवाईस पात्र राहील.
11) उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्याने मागणी केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळण्याची वाट न पाहता पुढील परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी विहित मुदतीत माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयामार्फत आवेदनपत्र संबधित विभागीय मंडळाकडे सादर करणे आवश्यक राहील.कोणत्याही परिस्थितीत निर्धारित मुदतीनंतर पुढील परीक्षेचे आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाही.
12) उत्तरपत्रिकेची छायाप्रत देण्यापूर्वी होणाऱ्या गुणपडताळणीमध्ये गुण वाढीमुळे सवलतीचे गुण मिळण्यास विद्यार्थी पात्र ठरत असल्यास त्यास ते गुण देय असतील.
13) उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/ यासाठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी http://verification.mh-ssc.ac.in व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील
14) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेनंतरच्या स्थलांतर पप्रमाणपत्रासाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. ११ वी तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेनंतरच्या प्रमाणपत्रासाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील
15) विध्यार्थ्याने उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी करावयाच्या ऑनलाईन भरावयाची माहिती बिनचूक भरावी.अर्ज प्रणालीमध्ये SUBMIT केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही
16) ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या प्रत्येक बाबीसाठी फक्त एकदाच अर्ज करता येईल.त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विषयाची संख्या निश्चित करूनच अर्ज भरण्याची कार्यवाही करावी.कोणत्याही परिस्थितीत दुबार अर्ज स्विकारले जाणार नाहीत
17) उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन करण्याकरिता अर्ज करतांना विषय शिक्षकांचा अभिप्राय PDF File स्वरूपात (File Size १५ MB पर्यंत) अपलोड करणे अनिवार्य आहे तसेच सदर अभिप्राय सुस्पष्ट असणे आवश्यक आहे
18) विध्यार्थ्यानी तांत्रिक बाबीसंदर्भात अडचणी/शंका असल्यास (support@msbshse.ac.in) या ई-मेल आयडी वर अथवा ०२०-२५७०५२०७, २५७०५२०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
19) ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात व्हिडीओ पाहण्यासाठी विध्यार्थ्यानी HELP या पर्यायाची निवड करावी.उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या चारही प्रकारासाठी स्वतंत्र व्हिडीओ देण्यात आलेले आहेत
20) विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रकीयेद्वारे केलेल्या अर्जाची सद्यस्थिती (status) संकेतस्थळावर पाहता येईल.आपल्या अर्जावरील प्रकिया पूर्ण झाल्यानंतरच आवश्यकता भासल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.