Labels

बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना

 

विद्यार्थिनींसाठी सूचना (26/07/2023)

इ. ११ वी व १२ वी च्या सर्व विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते की, केंद्र शासनाच्या National scholarship portal www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर धार्मिक अल्पसंख्यांक (मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी व जैन) विद्यार्थिनींसाठी असलेली बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेसाठी नवीन अल्पसंख्यांक विद्यार्थिनींचे ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नजीकच्या कालावधी मध्ये सुरु होत आहे. सदर योजनेच्या पात्रतेचे निकष व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे /प्रमाणपत्रे खालीलप्रमाणे आहेत. तरी पात्र लाभार्थी विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी  आपली कागदपत्रे तयार  ठेवावीत, म्हणजे ऑनलाईन अर्ज करताना अडचण येणार नाही.

पात्रतेचे निकष

(१) ९ वी ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील पात्र विद्यार्थिनी 

(२) मागील शैक्षणिक वर्षात 50 टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक. 

(३) पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. २ लाख पेक्षा कमी असावे. 

(४) उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याच्या सहीचे असणे बंधनकारक आहे. 

(५) एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. 

(६) आधार कार्ड असावे व ते बँक खात्यासाठी जोडणे आवश्यक आहे.

(७) इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. 

(८) शिष्यवृत्तीचे अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्यांचा दावा विचारात घेतला जाणार नाही. 

(९) विद्यार्थ्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल या योजनेच्या अटींचा भंग झाला असल्याचे  निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल.

(१०) जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसुली करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

१) बोनाफाईड प्रमाणपत्र 

(२) मागील वर्षाचे गुणपत्रक 

(३) धर्माबाबत पालकांचे स्वयंघोषित प्रमाणपत्र 

(४) पालकांच्या उत्पन्नाबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र 

(५) रहिवासी पुरावा 

(६) बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत /चेकची प्रत 

(७) विद्यार्थिनीचा स्वयंसाक्षांकित  फोटोग्राफ 

(८) आधार कार्ड